ब्राझील : २०२१-२२ मध्ये साखर उत्पादनात घसरणीची शक्यता

साओ पावलो : प्रतिकूल हवामानामुळे ब्राझीलमध्ये २०२१-२२ या हंगामातील साखर उत्पादन ३२ मिलियन टनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. गेल्या हंगामातील ३८.५ मिलियन टन उत्पादनापेक्षा हे खूपच कमी असेल. यासंदर्भात Unicaने दिलेल्यामाहितीनुसार, दुष्काळ आणि दाट धुके, दवामुळे या हंगामातील एकूण ऊस गाळप ५२५ मिलियन टनापर्यंत होईल अशी शक्यता आहे.

Unicaने एकूण इथेनॉल उत्पादन २७.७ बिलियन लिटर होण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरवर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ८.७ टक्क्यांनी कमी असेल. २०२१-२२ मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी वाटप करण्यात आलेल्या ऊसाचे प्रमाण ५५.१३ टक्के कमी दिसून आले आहे. एक वर्षापूर्वी हे ऊस वितरण ५३.९३ टक्के आहे.

Unicaचे तांत्रिक संचालक अँटोनिया डी पडूआ रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, पुढील हंगामातील ऊसाच्या क्षेत्राबाबतही अनिश्चितता आहे. सध्याच्या दव पडण्याच्या हवामानामुळे यात अधिक भर घातली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here