ब्राझील करणार अमेरिकेतून इथेनॉल आयात

वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी इथेनॉल उत्पादनातील वाढ ही पुरेशी ठरणार नाही. ही टंचाई भरुन काढण्यासाठी ब्राझील अमेरिकेतून इथेनॉलची आयात करणार आहे, असे एस अ‍ॅन्ड पी ग्लोबल प्लॅटसच्या विश्‍लेषकांनी सांगितले आहे.
येत्या काही वर्षात ब्राझीलमध्ये इथेनॉलची मागणी दरवर्षी अडीच टक्क्यांनी वाढेल. प्लॅटसचे वरिष्ठ जैवइंधन विश्‍लेषिक बिएट्रीज म्हणाले, कॉर्न बेस्ड इथेनॉल प्लान्टसकडून नवीन क्षमता आल्या असल्या तरी, वाढत्या मागणीनुसार पुरवठा करणे पुरेसे नाही. त्यामुळे ब्राझील इंधनाची आयात करणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ब्राझीलला इथेनॉल उत्पादनावर भर देणे सोपे झाले आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे किंमती कमी राहिल्या आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्यामुळे साखर कारखाने इथेनॉल उत्पादनाकडे वळले. ऊसाच्या सराबरोबरच कॉर्नमधूनही इथेनॉल तयार करण्याचे ब्राझीलचे उद्दीष्ट आहे.

साओ मार्टिन्हो हा देशातील सर्वात मोठा साखर कारखाना इथेनॉल उत्पादकापैकी एक आहे. कॉर्नपासून इथेनॉल तयार करण्यासाठी लागणार्‍या सुविधा देण्याची योजना गोयस राज्यात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here