राष्ट्रपती जायर बोल्सानारो यांच्या भारत यात्रेदरम्यान ब्राजील देणार इथेनॉलला गती

118

साओ पाउलो, ब्राजील: साखर आणि इथेनॉल उद्योग समूह यूनिका यांनी सांगितले की, जानेवारीमध्ये ब्राजीलचे राष्ट्रपती जायर बाल्सोनारो यांच्या भारत यात्रे दरम्यान इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे.

यूनिकाचे प्रमुख इवांद्रो गुसी यांनी सांगितले की, ब्राजील सरकार भारतात इथेनॉलला गती देण्यासंदर्भात सहकार्याबाबत चर्चा करणार आहे. यामध्ये उत्पादनाला गती आणि गैसोलीन मध्ये इथेनॉलला मिक्स करण्याबाबतही चर्चा होणार आहे, ज्यामुळे देशातील साखर साठा कमी करण्यासाठी आणि साखरेच्या जागतिक किमती वाढवण्यासाठी मदत मिळू शकेल. गुसी म्हणाले की, आपल्या इथेनॉल कार्यक्रमाला पुढे नेण्यामुळे भारताला मोठ्या आर्थिक आणि पर्यावरण संबंधी लाभ होवू शकेल.

गुसी यांनी सांगितले की, भारतात इथेनॉल च्या उत्पादन आणि मिश्रणात वाढ झाली तर भारत सरकारला साखर क्षेत्रासाठी अनुदान देण्यात तथा तेल आणि गैसोलीन च्या आयातीचा खर्च कमी करण्याची आवश्यकता कमी होईल. तसेच, मोठ्या स्तरावर पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रित करण्यामुळे भारतातील मोठ्या शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
भारतद्वारा साखर क्षेत्राला दिल्या जाणार्‍या अनुदानावर ब्राजील सरकार विश्‍व व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) आवाज उठवत आहे. ब्राजीलचे असे म्हणणे आहे की, भारताद्वारा साखर निर्यातीसाठी सरकारची मदत केल्यामुळे व्यापारी नियमांची पायमल्ली होत आहे. शिवाय यामुळे साखरेची जागतिक किंमत वाढ नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here