ब्राझील: अमेरिकेच्या अतिरक्त साखर कोट्याचे सरकारकडून उत्पादकांना वाटप

साओ पावलो : ब्राझीलच्या कृषी, पशूधन आणि पुरवठा मंत्रालयाने ऑक्टोबर २०२०- सप्टेंबर २०२१ या हंगामातील अमेरिकेकडून ब्राझीलच्या निर्यातदारांना दिलेला १२,६४० मेट्रिक टन अतिरिक्त साखर कोट्याचे वितरण उत्पादकांना देण्यात आले आहे. नोवाकॅना डॉट कॉमने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेने आधीच ब्राझीलच्या निर्यातदारांच्या १,४४,४१० टन साखर कोट्याला मंजुरी दिलीआहे. अमेरिकेकडून ब्राझीलच्या निर्यातदाराना १२,६४० मेट्रिक टन साखरेचा अतिरिक्त कोटा नंतर देण्यात आला आहे.

ब्राझीलच्या अलागोस राज्यातील निर्यातदार अमेरिकेचा साखर कोटा ४६.८ टक्के विक्री करतील. त्यानंतर त्यांची निर्यात ७३,५६० टनापर्यंत पोहोचेल. पेर्नंबुकोकडून ३०.२ टक्के म्हणजेच ४७,५१० टनाचा पुरवठा केला जाईल. तर पाराईबाकडून ७,६४० टन, रियो ग्रांडे डो नॉर्टकडून ७,५९० टन, बाहियाकडून ६,५५० टन, पियाऊकडून ४,६४० टन, सर्गिपकडून ४,५४० टन, पाराकडून ३,०७० टन, मारान्होकडून १,२९० टन साखरेचा पुरवठा केला जाणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here