साओ पाउलो : ब्राझीलच्या काही साखर कारखान्यांनी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. आणि उच्च ऊर्जेचा खर्च कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे.
याबाबत रॉयटर्समध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, यासंबंधीत असलेल्या एका ट्रेडरने सांगितले की, ब्राझीलमध्ये साखर व्यवहारात सहभागी असलेल्या प्रत्येक कंपनीकडून निर्यात करार रद्द करण्यात येत आहे. जवळपास २,००,००० ते ४,००,००० टन कच्च्या साखरेच्या निर्यातीचे करार रद्द करण्यात आले आहेत. ही स्थिती साखरेपासून इथेनॉल उत्पादनात बदलणे आणि पिकास होणाऱ्या उशीरामुळे झाली आहे. पिकाच्या अत्युच्च हंगामात ब्राझीलकडून दर महिन्याला २.२ मिलियन साखर निर्यात केली जाते.
ब्राझीलमध्ये बहुतांश कारखाने उत्पादनाबाबत फ्लेक्सिबल आहेत. साखर अथवा इथेनॉल उत्पादनाकडे हे कारखाने वळू शकतात. सध्या ऊर्जेच्या उच्च किमतीमुळे उत्पादन इथेनॉलकडे वळविण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात इथेनॉलची विक्री २.६ टक्के वाढली आहे. ब्राझील हा अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा इथेनॉल उत्पादक देश आहे.