ब्राझीलचा राजझेन कंपनीचा कृषी संशोधनावर भर

नवी दिल्ली : चीनी मंडी

इंधन क्षेत्रात पर्यायी स्रोत आता प्रमुख होऊ लागल्यानं ब्राझीलमधील सर्वांत मोठी ऊस उत्पादक कंपनी रायझेननं आपल्या धोरणांमध्ये बदल केले आहेत. बदलत्या परिस्थितीत आपले स्थान आणखी बळकट करण्यासाठी अॅग्रीटेक संशोधनावर कंपनीनं भर दिला आहे.

ब्राझीलमध्ये साखर, इथेनॉल आणि इतर जैवइंधन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये रायझेन आघाडीची कंपनी आहे. त्याचबरोबर देशातील सर्वांत मोठी तेल वितरण कंपनी आहे. अँग्लो-डच शेल कंपनीसोबत रायझेनची भागिदारी असून, ब्राझीलमधील कोसन कंपनीशीही रायझेन करारबद्ध आहे.

कंपनीने ऑगस्ट महिन्यात उसाच्या इतर उत्पादनांबरोबरच वीज निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली होती. सध्याच्या असलेल्या उत्पन्नाच्या सोत्रांबरोबर कंपनीला उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधायचे आहेत. कंपनीच्या या टार्गेटमुळेच आता संशोधनामध्ये गुंतवणूक वाढवण्यात येत आहे, तसेच डाळीला महत्त्व देण्यात येत आहे. त्याचबरोबर स्टार्टअपवरही भर देण्यात येत आहे.

यासाठी पिरासिकाबा या शहरात कंपनीकडून सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्या परिसरात होत असलेले शेतीमधील संशोधन, तज्ज्ञ मंडळी यांचा लाभ घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या संदर्भात कंपनीचे उपाध्यक्ष फॅबिओ माटो म्हणाले, ‘आम्ही आमच्यातील निष्क्रीयता थांबवली आहे आणि आमच्या पुरवठादारांकडून संशोधनाची अपेक्षा करत आहोत. या सगळ्या प्रक्रियेत डिजिटल क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला अपेक्षित असणाऱ्या क्षेत्रातील स्टार्टअप आणि नव्या संशोधनांना बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

सहकाऱ्यांचा शोध

कंपनी सध्या अपेक्षित भागीदारांच्या शोधात आहे. त्यासाठी कंपनीच्या एकूण प्रक्रियेमध्ये काय गरजेचे आहे? काय नाही? तसेच नव्या संधींचा शोध घेतला जात आहे.

कंपनीचा संशोधन प्रकल्प ऑगस्ट २०१७मध्ये सुरू झाला असला तरी, रायझनने ४०० स्टार्टअप आणि १५ वेगवेगळ्या स्तरावरील कंपन्यांना आपल्याशी जोडून घेतले आहे.

यात काही स्पर्धक कंपन्यांनीही आमच्याशी संपर्क साधला असून, या क्षेत्रात आमच्या कंपनीसारखे स्टार्टअपला सहकार्य कोणची करताना दिसत नाही.

भविष्यातील नियोजन

पुढच्या वर्षभरात रायझेन कंपनी आणखी ४० ते ५० स्टार्टअप कंपन्यांना बळ देणार आहे. त्याचबरोबर सध्या जोडण्यात आलेल्या स्टार्टअप कंपन्यांकडून त्यांना मिळणाऱ्या रिझल्टवर त्यातील पुढील गुंतवणूक करण्यात येणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here