भारतीय इंधन कंपन्यांनी दररोजप्रमाणे आज, १२ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. गेल्या पाच दिवसांप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारीही बदलण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय बाजारपेठेत सलग सहाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. यापूर्वी २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय स्तरावर १४ हप्त्यांमध्ये इंधन दरात १०-१० रुपये प्रती लिटर वाढ करण्यात आली आहे. मात्र, आता तेल दरवाढीला ब्रेक लागण्याचे संकेत आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रती बॅरलच्या खाली आले आहेत. यातून देशात पेट्रोल, डिझेलचे दर आता नियंत्रणात येऊ शकतात.
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. फेब्रुवारी ते मार्च यांदरम्यान कच्चे तेल १३९ डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे. २००८ नंतरचा हा उच्चांकी स्तर आहे. आता १०० डॉलर प्रती बॅरलच्या खाली आला आहे. भारतीय पेट्रोल वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या लेटेस्ट अपडेटुसार देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये तर डिझेल ९६.६७ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे. मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये आणि डिझेल १०४.७७ रुपये प्रती लिटर आहे. याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल ११५.१२ रुपये तर डिझेल ९९.८३ रुपये प्रती लिटर मिळत आहे. तर चेन्नईत पेट्रोल ११०.८५ रुपये प्रती लिटर आणि डिझेल १००.९४ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात.