श्रीपूर (सोलापूर) : कोरोनावर मात करण्यासाठी आतापर्यंत राज्यातील 49 सहकारी व खाजगी कारखान्यांनी हँड सॅनीटायजर निर्मितीचे परवाने मिळविले. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टीलरीने क्लीन ऑल या हँड सॅनीटायजरची निर्मिती केली आहे.
ब्रिमासागर डिस्टीलरीचे व्यवस्थापक दिनकर बेंबळकर म्हणाले, प्रतीदिन सहा हजार लिटर या प्रमाणे ‘क्लीन-ऑल’ या सॅनटायजरचे उत्पादन सुरू झाले आहे. लवकरच 180 मिली आणि 900 मिली या आकारात देखील उत्पादन तयार होईल.
आसवनी प्रकल्प आणि ज्या साखर कारखान्यांकडे आसवनी प्रकल्प आहेत अशा खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी हँड सॅनीटाजरची निर्मिती करावी असे आवाहन शासनाने केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी एका दिवसात ऑनलाईन परवाना शासनाने देऊ केला आहे.
त्यानंतर अनेक कारखान्यांनी ऑनलाईन परवाने मिळविले तरी प्रत्यक्षात काहीच कारखान्यांनी उत्पादन सुरू केले. सैनिटायझर बनवणारे सोलापूर जिल्ह्यातील कारखाने पुढील प्रमाणे , विठ्ठलराव शिंदे , विठ्ठल कार्पोरेशन, दि सासवड माळी ,ब्रिमासागर डिस्टीलरी ,श्री पांडुरंग