मंदी कमी करण्यासाठी ब्रिटानिया ची किंमतीत वाढ

कोलकाता – अर्थिक मंदीतून जाणार्‍या एफएमसीजी सेक्टरची प्रमुख कंपनी ब्रिटानिया बिस्किट नें आपल्या किंमतीत किरकोळ वाढ करण्याचे ठरवले आहेे. याबरोबरच कंपनी खर्चातही कपात करण्यासंदर्भात विचार विनिमय सुरु असल्याचे, ब्रिटानियाचे प्रमुख विनय सुब्रमण्यम यांनी सांगितले.

ते म्हणाले गेल्या पाच सहा महिन्यांपासून अर्थिक मंदीचे चित्र दिसत आहे आणि जानेवारी पर्यंत यामध्ये काहीही बदल होणार नाही. तिसर्‍या तिमाहीपासून अर्थात ऑक्टोबरपासून बिस्किटांच्या किंमतीत वाढ होणार आहे. आज अशी वेळ आली आहे की, पारले सारख्या कंपनीतही 10 हजार कर्मचार्‍यांच्या डोक्यावर नोकरी जाण्याचे संकट घोंघावत आहे.

ते पुढे म्हणाले, गेल्या पाच सहा महिन्यात उद्योग जगतात सकारात्मकता नाही. शिवाय पुढील सहा महिने खूप कठिण जाणार आहेत. सुब्रमण्यम यांच्या मतानुसार, कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे. ते म्हणाले, आम्ही परिस्थितीचे सर्वेक्षण करत आहोत. आंम्हाला आशा आहे की, कंपनीला मान्सूनचा फायदा होईल.

देशभरात बाजारपेठेत मोठी घसरण आहे, मंदीच्या परिणामी कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे. किंमतीत किरकोळ वाढ करण्याबरोबरच कंपनी किंमत अनुकूलन देखील करेल.

ते म्हणाले, लॉजिस्टिक्स खर्चात कपात करण्यासह इतर कामांमध्ये आंम्हाला अधिक कार्यक्षम करावे लागेल. आंम्हाला 6 टक्के वाढ होईल असे वाटत होते. पण बाजारातच मंदी आहे. कंपनीच्या प्रॉफिटमध्ये तिप्पट घट झाली आहे. बिस्किटांच्या विक्रीमध्ये जीएसटीमुळे घट आल्याचे त्यांनी सांगितले. 18 टक्के जीएसटी लागू झाल्यानंतर त्यांनी बिस्किटांच्या किमती तरी वाढवायला हव्या होत्या किंवा बिस्किटाचे वजन तरी कमी करायला हवे होते.
सुब्रमण्यम म्हणाले की, देशभरात ब्रिटानियाचा बाजारातील वाटा 33 टक्के होता. पूर्व भारत हा कंपनीसाठी महत्त्वाचा बाजार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here