बांगलादेशला तस्करी होणारी २९,००० किलो साखर BSF मेघालयकडून जप्त

बांगलादेशमध्ये तस्करी केली जाणारी जवळपास ११ लाख रुपयांची २९,००० किलो साखर जप्त करण्यात आली आहे. साखरेने भरलेल्या ७ देशी नौका जप्त करण्यात आल्या आहेत, असे मेघालय सीमा सुरक्षा दलाने (Border Security Forces/BSF) शनिवारी आपल्या BSF च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

याबाबत ANI मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बीएसएफ मेघालयने शुक्रवारी देशात तयार झालेल्या इंजिनच्या सात नौका रोखल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर भरली होती. ती बांगलादेशला नेण्यात येत होती.

याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, १४ जुलै २०२३ रोजी BSF मेघालयच्या सतर्क सैनिकांनी पश्चिम जैतिया हिल्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये तस्करी करून मोठ्या प्रमाणात सात देशी इंजीन निर्मिती नौका जप्त करण्यात आल्या.

एका गुप्त सुचनेनंतर कारवाई करताना सतर्क बीएसएफच्या जवानांनी बीपीओ जलिया खोला जवळील हरई नदीत काही नौकांमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे पाहिले. संशयितांना इशारा दिल्यानंतर ते आपल्या नौका सोडून पाण्यात उडी मारून पोहून बांगलादेशला पळून गेले.

निवेदनात म्हटले आहे की, बीएसएफने ११ लाख रुपयांहून अधिक किमतीची साखर जप्त केली आहे. ती डावकी सीमा शुल्क कार्यालयाकडे (Dawki Customs Office) सुपूर्द करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here