BSF मेघालयकडून बांगलादेशसाठी तस्करी केली जाणारी साखर जप्त

बाघमारा, मेघालय : बीएसएफ मेघालयच्या (BSF Meghalaya) ४३ बटालियनच्या जवानांनी मंगळवारी मेघालय पोलिसांसोबतच्या एका संयुक्त मोहिमेत दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये तस्करीसाठी घेऊन जाणाऱ्या ३,००० किलो साखरेसह काही लोकांना अटक केली.

एका गुप्त माहितीवरून कारवाई करताना BSF आणि बाघमारा पोलिसांनी (Baghmara police) वाहन (बोलेरो पिकअप) अडवले. हे वाहन आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात जात होते.

सुरुवातीच्या चौकशीत पकडलेल्या लोकांनी सांगितले की, बाघमारा येथील रहिवासी आहेत. त्यांनी वाहनात साखर भरली होती. अटक केलेले तस्कर आणि जप्त वाहनाला बाघमारा पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे.

यापूर्वीही बीएसएफने बांगलादेशला जाणारी साखर जप्त केली होती. अवैध निर्यातीवर निर्बंध लागू करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. मींटमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर तस्करी रोखण्यासाठी सरकारने बीएसएफसोबत चर्चा केली आहे.
सद्यस्थितीत भारताने साखर निर्यातीवर निर्बंध लावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here