बीएसएनएल येणार आता व्यावसायिक रुपात

नवी दिल्ली : भूकंप, वादळ अथवा सुरक्षाविषयक प्रसंगी या कंपन्या लोकांच्या मदतीला धावून येतात. त्यामुळे त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएल या दान्ही कंपन्यांना व्यावसायिक स्वरुप देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत दिली.  यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले, बीएसएनएल व एमटीएनएल मधील कर्मचार्‍यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 50 वर आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.

आर्थिक अडचणींमुळे बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांचे सप्टेंबरपर्यंत तर एमटीएनएलच्या कर्मचार्‍यांचे ऑगस्टपर्यंतच पगार झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. प्रसाद म्हणाले, या कंपन्यांत लागू केलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला कर्मचार्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बीएसएनएलमधील 79 हजार तर, एमटीएनएलमधील 14 हजार कर्मचार्‍यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. बीएसएनएलच्या मासिक उत्पन्नातील 75 टक्के हिस्सा हा कर्मचार्‍यांच्या पगारावर खर्च होतो. तर एमटीएनएलच्या बाबतीत हा आकडा 87 टक्के आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांत हे प्रमाण तीन ते सहा टक्के आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here