बजट २०२२ : यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या क्षेत्राला सवलतींचे गिफ्ट मिळणार याची उत्सुकता

देशाला कोविडच्या दोन लाटांचा तडाखा बसला आहे. तर तिसऱ्या लाटेचा प्रभाव अद्याप कायम आहे. अशा स्थितीत यंदाचा अर्थसंकल्प २०२२ सादर होत आहे. या बजेटवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने बाजारात एक संशयाचे वातावरण आहे. अशा स्थितीत एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करतील.

याबाबत लाईव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या सेक्टरवर अधिक लक्ष राहील, याबाबत अभ्यासकांनी सांगितले की, रिअल इस्टेट, पब्लिक सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर याशिवाय काही सेक्टरवर अधिक भर दिला जाईल. शेअर इंडिया सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि रिसर्च हेड रवि सिंह म्हणाले, अर्थव्यवस्था रुळावर यावी यासाठी खूप मदत दिली जात आहे. आता आम्हाला असे वाटते की यंदा बँकिंग, ऑटो, इन्फ्रा, फर्टिलायझर, शुगर इंडस्ट्री यावर बजेटमध्ये अधिक फोकस असेल. प्रोफेशियंट इक्विटीजचे संस्थापक आणि संचालक मनोज दालमिया म्हणाले, रिअल इस्टेट, एनएमपी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे, कृषी अशा प्रमुख क्षेत्रांवर यंदा लक्ष दिले जाईल असे दिसते. एक जानेवारी रोजी बजेट सादर होईल. तर ३१ जानेवारी रोजी देशाचा आर्थिक सर्व्हे सादर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here