बजेटमुळे अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता येईल : निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शाश्वत विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेत स्थिरता, करप्रणालीत सुसुत्रता तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेतील भविष्यसूचकतेसाठी विकसित दृष्टी आणण्यासाठी उपयुक्त ठरणारे बजेट सादर केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले. राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ वरील सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. जर भारताकडे आगामी १०० वर्षांचे व्हीजन नसेल तर आधीच्या ७० वर्षांसारखे नुकसान होईल असे त्या म्हणाल्या.

सीतारमण म्हणाल्या, आगामी २५ वर्षे भारतासाठी महत्त्वपूर्ण आहेत. जर आज आपण यास अमृतकाळ म्हणत असलो तर त्यात कोणतेही आश्चर्य नाही. सीतारमण यांनी सांगितले की, पीएम गती शक्ती योजनेद्वारे आम्ही करत असलेल्या पायाभूत सुविधांचा खर्चादरम्यान अधिक ताळमेळ ठेवला आहे. अधिक गतीने काम होण्यासाठी मार्गदर्शक सिद्धांतासाठी काम केले आहे. त्यांनी सांगितले की, भारतातील कृषी क्षेत्रातील सुधारणा, आधुनिकीकरणासाठी ड्रोन एका उपकरणाच्या रुपात प्रभावी ठरत आहे. ड्रोन आणून आम्ही खते, किटकनाशके यांच्या वापरात दक्षता घेत आहोत. याशिवाय, उत्पादनाचा अचूक अंदाज व्यक्त करणे शक्य बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here