अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करेल: पंतप्रधान मोदींना विश्वास

नवी दिल्ली : आज, ३१ जानेवारी रोजी संसदेत बजेट सत्राची सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सदनातील सदस्यांच्या संयुक्त बैठकीत आपले पहिले अभिभाषण करतील. अर्थसंकल्पीय अभिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. तर दुसरा टप्पा १३ मार्च ते सहा एप्रिल असा असेल. बजेटच्या सत्रामध्ये २७ बैठका होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा, आकांक्षांची पूर्तता करेल.

रिपब्लिक वर्ल्डने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले की, अस्थिर जागतिक स्थितीच्या दरम्यान, भारतीय अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य नागरिकांच्या, आशा-आकांक्षांची पूर्तता होणार आहेय. जगाला या अर्थसंकल्पातून आशेचा किरण दिसत आहे. मला दृढ विश्वास आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतील. भारत प्रथम, नागरिक प्रथम या तत्वानुसार या बजेटमध्ये लोकांचे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मला आशा आहे की विरोधी पक्षांचे नेतेही आपले मत संसदेमध्ये मांडेल. आमच्या अर्थमंत्री एक महिला आहेत. त्या देशासमोर उद्या अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपतींचे अभिभाषण हा सन्मानाचा क्षण असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here