बुढवल साखर कारखाना लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

बाराबंकी : रामनगर येथील बुढवल साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन लवकरच पूर्ण केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. विधानसभेत सादर केलेल्या पुरवणी बजेटवेळी त्यांनी ही माहिती दिली.

हा कारखाना सुरू झाल्यानंतर पाच हजार लोकांना रोजगार मिळू शकेल. यासोबतच आसपासच्या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल असे ते म्हणाले.

रामनगर विभागातील बुढवल साखर कारखाना नऊ वर्षांपासून बंद पडला आहे. रामनगरचे आमदार शरद कुमार अवस्थी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुढवल साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी केली होती.

आमदार शरद कुमार अवस्थी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पुरवणी अंदाजपत्रकाच्या सादरीकरणावेळी कारखाना पुन्हा सुरू केला जाईल असे सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून सहमती मिळाली आहे. लवकरात लवकर भूमीपुजन करून कारखाना सुरू केला जाईल.

कारखाना २०१३ मध्ये पूर्णपणे बंद पडला. त्यानंतर याची मशीनरीही भंगारात रुपांतरीत झाली आहे. येथे सुमारे चार हजार कर्मचारी काम करत होते. कारखान्याची बहराइच मार्गावर शेकडो एकर जमीन आहे. कारखाना पुन्हा सुरू झाल्यास पाच हजार लोकांना रोजगार मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here