तामिळनाडू: बुरेवी चक्रीवादळामुळे ऊस पीकाचे नुकसान

79

चेन्नई: निवार चक्रीवादळानंतर तामिळनाडू मध्ये बुरेवी चक्रीवादळाने कहर माजवला आहे. ज्यामुळे ऊसा सह इतर अनेक पीकांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळ बुरेवी आता कमजोर होण्याची आशा आहे. 3 डिसेंबर पासून पंबन क्षेत्रामध्ये गेल्या काही तासांपासून चक्रीवादळ स्थिर झाले आहे, आणि डेल्टा सहित पश्‍चिमी घाटात सातत्याने पाउस पडला आहे. केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी च्या कराईकल जिल्ह्यामध्ये ही गेल्या 24 तासात मोठा पाउस कायम राहिला. कुड्डालोर जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून संततधार पाउस होत आहे. राष्ट्रीय आपातकालीन प्रतिक्रिया बल (एनडीआरएफ) ची चौदा पथके विविध जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहेत.

चक्रीवादळाने तिरुवरुर जिल्ह्यामध्ये तांदळाचे पीक आणि ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. चेन्नईसह राज्याच्या उत्तर भागातील अनेक जिल्ह्यांमध्येही पाउस झाला आहे. रामनाथपुरम आणि विझुपुरम सह तटीय गावांमध्ये मासे पकडणार्‍या नौकांचेही नुकसान झाले आहे. कुड्डालोर जिल्ह्यामध्ये 35,000 पेक्षा अधिक लोकांना मदत शिबिरांमध्ये आणण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here