शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक

90

बलरामपुर : इटवा गावामध्ये विजेच्या तारांमधून झालेल्या शॉर्ट सर्किटने ठिणगी पडून चार एकर ऊस आगीत जळून खाक झाला. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. महसूल विभागाच्या निरीक्षकांनी घटनास्थळी पंचनामा करून नुकसानीचा अहवाल लेखपालांना पाठवला आहे.

रेहरा बाजार ठाण्याअंतर्गत अधीनपूर गावातील राजेंद्र यादव यांनी सांगितले की, इटवा गावातील त्यांच्या शेतावरून विजेची तार गेली आहे. या तारांमधील घर्षणातून ठिणगी पडली. त्यामध्ये त्यांच्या शेतातील दोन एकर ऊस आणि शेजारील डी. पी. शुल्का यांच्या शेतातील दोन एकर ऊसही जळाला. आगीची माहिती समजताच आलेल्या ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवले. महसूल विभागाचे निरीक्षक मोहम्मद वसीर यांनी सांगितले की, लेखपाल सुशील मिश्र यांना पंचनामा पाठविण्यात आला आहे. नुकसानीचा अंदाज घेऊन लवकरच शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here