चार एकरांतील ऊस आगीत जळून खाक

96

संभल, उत्तर प्रदेश: संभलमधील रजपुरा परिसरात अतिउच्च दाबाची विजेची तार तुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिक जळून खाक झाले. ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणली. मात्र, शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.

रजपुरा परिसरातील डुप्ला कला येथील हरिशंकर यांच्या शेतावरून अतिउच्च दाबाची तार गेलेली आहे. गुरुवारी मध्यरात्री अचानक अतिउच्च दाबाची तार तुटली. या आगीत शेतातील ऊस पिक जळून खात झाली. आग लागल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी तातडीने तेथे धाव घेतली. प्रचंड प्रयत्नांनंतर चार एकरातील ऊस जळून खाक झाला. सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here