अडीच एकर ऊस आगीत जळून खाक

160

संगमनेर (नगर): ऊस लागवड केलेल्या क्षेत्रात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत परिसरातील अडीच एकर ऊस जळून खाक झाला. यामुळे शेतकर्‍याचे तब्बल सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या आसपास घडली. ऊसाच्या जमिनीवरुन गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली.

हा ऊस प्रतापपूर येथील पांडूरंग भिकाजी आंधळे यांचा होता. जो आश्‍वी बुद्रुक ते प्रतापपूर शिवेवर गट क्रमांक 508 मध्ये लावण्यात आला होता. या क्षेत्रात शॉट सर्किट झाले. विहिरीवर पंपासाठी विजेच्या तारा ओढण्यात आल्या आहेत. त्यांच्यात घर्षण होवून आग भडकली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
परिसरातील इतर शेतकर्‍यांनी रोटाव्हेंटर तसेच ऊस तोडून जाळपट्टे तयार करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर ताबा मिळवता आला. या घटनेत आंधळे यांचे सात लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here