केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, 2024 साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवर पोषण तत्व आधारित अनुदान दरांना तसेच पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेत 3 नवीन खत श्रेणींचा समावेश करण्यास दिली मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, 2024 साठी (01.04.2024 ते 30.09.2024 पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K) खतांवर पोषण तत्व आधारित अनुदान दर निश्चित करण्याच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत 3 नवीन खतांचे प्रकार समाविष्ट करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. खरीप हंगाम 2024 साठी तात्पुरती अर्थसंकल्पीय गरज अंदाजे 24,420 कोटी रुपये असेल.

फायदे:

शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी दरात खतांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल.
खतांच्या आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील कल लक्षात घेऊन फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण .

पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत 3 नवीन खतांच्या श्रेणी समाविष्ट केल्याने मातीचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी मदत होईल आणि मातीच्या गरजेनुसार सूक्ष्म पोषक तत्वांनी युक्त खते निवडण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध होईल.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्ट :

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत या खतांची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी खरीप 2024 साठी (01.04.2024 ते 30.09.2024 पर्यंत लागू) मंजूर दरांवर आधारित फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवर अनुदान दिले जाईल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here