पुढील वर्षासाठी ऊसाला ३०५ रुपये प्रती क्विंटल एफआरपी देण्याचा CACPचा प्रस्ताव : मीडिया रिपोर्ट

92

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना पुढील वर्षी आपल्या ऊस विक्री दरात २.५ टक्के वाढ मिळेल अशी शक्यता असल्याचे वृत्त द हिंदू बिझनेस लाइनने दिले आहे. कृषी उत्पादन खर्च आणि दर आयोगाने (सीएसीपी) उताऱ्याच्या दरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानुसार नव्या दराची आकारणी होणार आहे. जर केंद्र सरकारने सीएसीपीच्या शिफारशी स्वीकारल्या तर ऊस दराची एफआरपी २०२२-२३ या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) १०.२५ टक्के रिकव्हरीसाठी ३०५ रुपये प्रती क्विंटल असेल.

चालू हंगाात १० टक्के रिकव्हरीसाठीचा एफआरपी दर २९० रुपये प्रती क्विंटल आहे. जेवढा अधिक उतारा असेल, त्यानुसार ऊसाची किंमत अधिक असेल. उसाचा रिकव्हरी दर उत्पादीत साखरेच्या तुलनेत अधिक आहे, रसावर आधारित हा दर ठरतो.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, साखर उद्योगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याची जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन, जेव्हा भारत कोणत्याही अनुदान सवलत योजनेशिवाय उच्चांकी प्रमाणात निर्यात करण्यात सक्षम आहे. महसूल विभागणीच्या फॉर्म्युल्यावर सीएसीपीच्या शिफारशींचा स्वीकार करण्याची गरज आहे. तरच ऊस थकबाकीच्या समस्या सोडवणे शक्य होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here