कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ बेपत्ता

189

मंगळुरू – देशातील सर्वात मोठी कॉफी साखळी कॅफे कॉफी डे चे संस्थापक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई व्ही जी सिद्धार्थ सोमवारी रात्रीपासून बेपत्ता आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी उल्लाल पुलावरुन उडी मारली आहे.

हा पूल मंगळूरु पासून 6 किलोमीटर दूर नेत्रावती नदीवर आहे. मंगळूरु शहर पोलिसांनी त्या पुलावरुन उडी मारणार्‍या व्यक्तीचा तपास करणे सुरु केले आहे. याबाबतीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहिम सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ 29 जुलैला मंगरुळच्या दिशेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान नेत्रावती नदींच्या पुलावर त्यांनी आपली कार थांबवली आणि बाहेर येवून परिसरात फिरत होते. यानंतर बराच वेळ उलटल्यानंतरही सिद्धार्थ परतलेच नाही. तेव्हा त्यांच्या चालकाला चिता वाटू लागली. यानंतर तणावात आलेल्या चालकानं सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांना फोनवरुन घडल्या प्रकाराची माहिती दिली. कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसात धाव घेतली. असे सांगितले जात आहे की, सिद्धार्थ यांनी कॅफे कॉफी डे येथील कर्मचारी आणि निर्देशक मंडळाला पत्र लिहिले होते. पत्रात त्यांनी म्हटले होते की, व्यवसायातील कुठलीही अर्थिक देवाण घेवाण ही माझी जबाबदारी आहे, याबाबत माझ्याशिवाय इतर कोणालाही पोलिसांनी जबाबदार धरु नये.

25 जलतरणकर्त्यांसह 200 हून अधिक लोक शोध मोहिमेत गुंतले. काल, ते बेगळूरु हून साकलेशपूरला जात आहे असे सांगून बाहेर पडले होते. परंतु वाटेत त्यांनी ड्रायव्हरला मंगरुळला जाण्यास सांगितले. उल्लाल पुलावर पोहोचल्यावर ते गाडीतून खाली उतरले. सिद्धार्थने ड्रायव्हरला जरा पुढे जाण्यास सांगितले. मी चालत येतो असे सांगितले पण परतले नाहीत. श्‍वान पथकही त्यांना शोधत पुलाच्या मध्यभागी थांबले, असे मंगळुरू शहर पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here