श्री शंकर कारखाना निवडणुकीसाठी मदनसिंह मोहिते-पाटील यांचा प्रचार दौरा

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या दोन जागांसाठी लागलेल्या निवडणुकीसाठी प्रचार दौरा सुरु केला आहे. कारखान्याच्या २१ जागांपैकी मोहिते-पाटील गटाच्या १९ जागा बिनविरोध झाल्या असून माळशिरस व इस्लामपूर उत्पादक गटातील दोन जागांसाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी मोहिते-पाटील गटाचे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मदनसिंह मोहिते-पाटील यांनी गिरझणी, तिरवंडी, उंबरे दहिगांव, मेडद, मारकडवाडी, कदमवाडी, फोंडशिरस, पळसमंडळ आदी गावांचा प्रचार दौरा केला. माजी. जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, मिलींद कुलकर्णी, गणपतराव वाघमोडे, दत्तात्रय चव्हाण, रामदास कर्णे, संजय कोरटकर, चंद्रकांत शिंदे, शिवाजी गोरे, सुरेश मोहिते, अरविंद भोसले, उमेदवार दत्तात्रय रणनवरे, सुरेश पाटील, महादेव शिंदे, कुमार पाटील, बाळासो माने, सदाशिव पाटील, सुनिल माने, नंदन दाते आदी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here