साखर कारखान्यांमध्ये रोख रकमेच्या समस्येमुळे ऊस शेतकरी अडचणीत

नवी दिल्ली : ऊस  शेतकर्‍यांचे प्रलंबित असणारे ऊस बिलाचे पैसे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करत आहे. आइस्क्रीम, कोल्डड्रिंक्स आणि चॉकलेट सारख्या विविध प्रकाराच्या उत्पादनांच्या कन्फेशर आणि निर्मार्त्यांकडून औद्योगिक वापरातील कमी मागणीमुळे साखर विक्री ठप्प झाली आहे. याशिवाय साखरेची इतर उत्पादनांची विक्रीही कमी आहे ज्यामुळे साखर कारखान्यांसमोर उत्पन्नाची  समस्या निर्माण झाली आहे.

भारतात ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्‍या उत्तर प्रदेशामध्ये शेतकर्‍यांचे 14,000 करोड रुपये अजूनही बाकी आहेत. उत्तर प्रदेश साखर कारखाना असोसिएशन चे सचिव दीपक गुप्तारा यांनी सांगितले की, आम्ही यावर्षी ऊसाचे अधिक उत्पादन करत आहोत. तर या हंगामात ऊस अधिक मिळाल्याने उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनात रेकॉर्ड बनवले आहे. इस्मा कडून उपलब्ध आकड्यांनुसार, उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी 15 मे 2020 पर्यंत 122.28 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. जे गेल्या वर्षी याच तारखेला उत्पादीत 116.80 लाख टन उत्पादनाच्या तुलनेत 5.48 लाख टन जास्त आहे. हे उत्पादन राज्यातील आतापर्यंतचे सर्वात अधिक उत्पादन आहे. यावर्षी 119 साखर कारखान्यांपैकी 73 कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. आणि 46 कारखान्यांचे गाळप अजूनही सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here