ऊस शेतकऱ्यांना मिळणार 2,500 रुपये प्रति क्विंटल दराने साखर

चंदीगड (पंजाब) : पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी घोषणा केली की, कोरोना वायरस च्या लॉक डाउन दरम्यान सहकारी साखर कारखान्यांकडून राज्यातील ऊस शेतकऱ्यांना 2,500 रुपये प्रति क्विंटल दरप्रमाणे साखर मिळणार.

रंधावा यांच्या मतानुसार, पंजाबच्या सर्व ९ सहकारी साखर कारखान्यांना सूचना दिल्या आहेत की, त्यांनी लगेचच ऊस शेतकऱ्यांना 2,500 रुपये प्रति क्विंटल दराने साखर द्यावी. तसेच रंधावा यांनी शेतकऱ्यांची ऊसाची थकबाकी ही देण्याबाबत सांगितले आहे.

शुगर फेड चे मुख्य निदेशक पुनीत गोयल म्हणाले, यामुळे केवळ ऊस शेतकऱ्यांना त्यांच्या घरगुती वापरासाठी साखर खरेदी करण्यात मदत होणार नाही, तर यामुळे आगामी ऊस तोडणी च्या काळात शेतामध्ये काम करणारे श्रमिक आणि प्रवासी मजूरांनाही फायदा होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here