एफआरपी चे व्याज मिळावे

कोल्हापूर, ता. 21 .ऊस उत्पादकांच्या थकीत एफ आर पी रक्कमेवर व्याज अद्याप कोणत्याही साखर कारखाने ने जमा केले नाही .आर आर सी कायदयाने व्याज देणे बंधनकारक असतानाही मुजोर साखरसम्राटांकडून कायदयाची ही पायमल्ली होत आहे . अशा साखर कारखानदारावर जप्तीची कारवाई करा अन्यथा २६ जानेवारी पासून हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असले चा इशारा जय शिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुश या संघटनांनी दिला आहे .

याबाबत तहसिलदार प्रदिप ऊबाळे यांना दिलेल्या निवेदनात कोल्हापूर जिल्हयातील सर्वच साखर कारखानदार यांनी एफ. आर .पी च्या थकीत रकमेवर व्याज शेतकऱ्यांला देनेच्या आर आर .सी. कायदयातील तरतूदी ची अंमलबजावनी केली नाही . या संदर्भात राज्य साखर आयुक्त . जिल्हा अधिकारी यांनी आदेश देवूनही व्याजरकमे बाबत अद्याप एक रुपयाहीजमा केला नाही . अशा साखर कारखान्यांवर वर जप्ती व त्यांची बँक खाती सील करावीत . या मागणी साठी वारंवार पाठ पुरावा करूनही अद्याप ऊस उत्पादकांना न्याय मिळत नाही . याबाबत हातकणंगले तहसिलदार यांनी आर आर सी कायद्याची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देनेत आला आहे. यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे . जय शिवराय संघटनेचे शिवाजीराव माने यांचे सह राकेश जगदाळे . धनाजी पाटील सदाशिव कुलकर्णी भैरवनाथ मगदूम . पुंडलीक बिरांजे उपस्थित होते .

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here