ज्याचा माल, त्याचा हमाल: ३१ ऑगस्टपर्यंत देशभरात पश्चिम महाराष्ट्रातून साखरेची वाहतूक बंद

सातारा: भारतात पश्चिम महाराष्ट्रात ३१ ऑगस्टअखेर साखरेसह इतर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय विविध वाहतूकदार असोसिएशन आणि ट्रक युनियनच्या बैठकीत घेण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील कराड येथे १९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पुन्हा एकदा ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ या मुद्यावर चर्चा करण्यात आली. माल वाहतूक करताा लोडिंग, अनलोडिंग वराई शुल्क म्हणूनही याला ओळखले जाते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश गवळी होते. कोल्हापूर ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन, सातारा ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, कराड ट्रान्स्पोर्ट आणि मोटार मालक असोसिएशन, सांगली ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, पुणे ट्रक ओनर असोसिएशन, शिरोली नागाव ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, सोलापूर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, रत्नागिरी ट्रान्सपोर्ट असोसिएशन, सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्ट असोसिएशन, फलटण ट्रक-मोटार मालक असोसिएशन, शिरोली ट्रक-मोटार मालक असोसिएशन, मिरज ट्रक-मोटार मालक युनियन, मिरज स्वाभीमानी ट्रक ओनर संघटना, फलटण ट्रक-मोटार मालक युनियन, हातकणंगले-वाठार ट्रक-मोटार मालक युनियनसह अनेक ट्रान्सपोर्ट आणि मोटर मालक युनियनचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होते.

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्टर्स आणि मोटार मालकांनी ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ या विषयावर आंदोलन सुरू केले आहे. विविध ठिकाणी या मुद्यावर अनेकदा चर्चा झाली. त्यावर मध्यम मार्ग काढण्यात आला. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या एक वर्षापासून या मुद्यावर चर्चा सुरू आहे.

नियम लागू असूनही मालाची भरणी-उतरणीचा खर्च वाहतूकदारांना उचलावा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे वाहतूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर साखर वाहतुकीसह इतर कोणत्याही मालाचे, ज्याची भरणी-उतरणी करावी लागते, ते ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत या निर्णयाची अंमलबजावणी सर्वांनी करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले.

चीनीमंडी न्यूजशी बोलताना सांगली जिल्हा ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी आणि सांगलीस्थित वाहतूकदार जयंत सावंत म्हणाले, मालाची भरणी आणि उतरणीची वराई हे वाहतूकदारांसाठी सॉफ्ट टार्गेटप्रमाणे आहे. वाहतुकदारांच्या म्हणण्यानुसार, यासाठी चालक अथवा वाहतूकदार जबाबदार नाही. विविध ज्यांमध्ये वाहतूकदारांकडून विविध वस्तूंची वाहतूक केली जाते. मात्र, चालक अथवा वाहतूकदाराला वाहतुकीसाठी किती रक्कम आकारली जाते, याची माहिती नसते. मालाची वाहतूक करणे एवढेच काम आमचे आहे. दुसरीके वराईसाठी आकारणे जाणारे शुल्क १०० ते १५० रुपये टन असते. मात्र, त्यातून आमचा वाहतूक खर्च वाढतो. आम्ही आता हा खर्च पेलू शकत नाही. त्यामुळे माल ज्याचा असेल, त्यानेच त्यासाठी जबाबदार राहीले पाहिजे.

नाव न सांगण्याच्या अटीवर मुंबईतील एका व्यापाऱ्यांनी सांगितले की, व्यापारी हमाली शुल्क देण्यासाठी तयार आहेत. मात्र, दोनच पद्धतीने याची आकारणी होईल. वाहतूकदारांकडून हमालीचा समावेश वाहतूक भाड्यात करावा लागेल. विक्री केलेल्या साखरेच्या बिलिंगवेळी कारखानदार व्यापाऱ्यांकडूनही लोडिंग चार्ज वसूल करू शकतील.

ते म्हणाले, मात्र, व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वाहतूकदारांच्या माध्यमातून वाहतुकीच्या अशा खर्चासाठी उत्तरदायीत्व गरजेचे आहे. जर कारखानदाराला थेट पेसै दिले जात नसतील तर हे पैसे देण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला पाठवले जाऊ शकते.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here