एफआरपी थकवली, काटा मारला; कारखाना गोत्यात

793

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

बदायूं (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

शेतकऱ्यांची ऊस बिले थकविल्याबरोबरच ऊस वजन काटा मारण्यासारखे गैरप्रकार केल्याप्रकरणी यदू साखर कारखान्यावर न्यायालयीन कारवाई होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सातत्याने या संदर्भात सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका आता यदू साखर कारखान्याला होणार आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस फासवणूक प्रकरणी दोघांचा शोध घेत आहेत.

यदू साखर कारखान्याचा विचार केला तर, कारखान्याने गेल्या हंगामातील ऊस बिल थकबाकी भागवली आहे. मात्र, यंदाच्या हंगामातील ऊस बिले अद्याप थकीत आहेत. कारखान्याकडे १०८ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असताना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. तसेच कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. पण, कारखाना व्यवस्थापनाकडून सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. थेट जिल्हाधिकाऱ्यांनी यात आदेश देऊनही त्याच फारसा परिणाम झाला नाही. जप्तीच्या कारवाईचा इशारा दिल्यानंतरही शेतकऱ्यांचे पैसे भागवण्यास सुरुवात झाली नाही.

या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने कारखान्याची चार लाख क्विंटल साखर जप्त केली. त्यानंतरही साखर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांचे पैसे भागवले नाहीत. त्यामुळे जिल्हा ऊस अधिकारी रामकिशन यांच्या आदेशानंतर, जिल्हा ऊस विकास समितीचे सचिव निरेंद्र कुमार यांनी बिसौली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे, फसवणूक, तसेच साखरेच्या विक्रीतून आलेल्या पैशांचा अपव्यय करणे याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी लवकरच दोषींना अटक करण्यात येईल, असे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here