पॅकेटबंद, लेबलयुक्त खाद्यपदार्थांवरील जीएसटी रद्द करण्याची CIATची मागणी

65

नवी दिल्ली : व्यापाऱ्यांची मुख्य संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CIAT) पॅकेटबंद आणि लेबल असलेल्या खाद्य पदार्थावरील ५ टक्के जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे. सरकारने १८ जुलै रोजी पॅकेटबंद तसेच लेबलवाल्या खाद्य पदार्थांवर तसेच आटा, डाळ, आणि तांदुळावर ५ टक्के जीएसटी लागू केला आहे. २५ किलोपेक्षा कमी वजनाच्या पॅकेटवर हा जीएसटी आहे. कॅटने याबाबत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.पत्रात ब्रँड नसलेल्या खाद्यपदार्थ तसेच वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी मागे घेण्याची मागणी केली आहे.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कॅटचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले की, सरकारने विना ब्रँडवाल्या खाद्यपदार्थांवर तसेच उत्पादनांवरील जीएसटी मागे घेण्यासाठी एक आपत्कालीन बैठक बोलावण्याची गरज आहे. खंडेलवाल यांनी सांगितले की, देशातील छोट्या क्षेत्रात तसेच गावांमध्ये आज खुले पदार्थ विकले जात नाहीत. किमान १०० ग्रॅमपर्यंतचे साहित्यही पॅकबंदच विकले जाते. ते म्हणाले की, देशातील ८५ टक्के जनता विना ब्रँड वस्तू खरेदी करते. यावर लागू केलेल्या टॅक्सच्या निर्णयाला देशभर विरोध सुरू आहे. जनतेला कराच्या ओझ्यातून बाजूला सारण्यासाठी आणि छोट्या व्यापाऱ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी जीएसटी हटविण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here