नजीबाबाद साखर कारखाना परिसरात चोरी केलेले लोखंड पकडले

नजीबाबाद :शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात लोखंडाचे स्क्रॅप चोरताना सहा लोकांना कारखाना सुरक्षारक्षकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.

शेतकरी सहकारी साखर कारखाना नजीबाबाद च्या ठेकेदारांद्वारा साखर कारखाना परिसरात कचरा काढण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली लावली आहे. एक ट्रॅक्टर चालकाने हा कचरा उठवताना कारखाना परिसरातील स्क्रॅपला कचर्‍यासह ट्रॉलीमध्ये भरले. साखर कारखान्याचे सुरक्षा रक्षक तात्काळ तिथे पोचले आणि ट्रॅक्टर चालक आणि त्यांच्या साथीदारांना पकडले.
कारखान्यातून पकडण्यात आलेल्यामंध्ये चालक अजय, अभिषेक, टीपू, सोमपाल, विनीत यांच्याकडून स्क्रॅप ताब्यात घेवून त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले. या पकडलेल्या लोखंड चोंरांची पोलीस चौकशी करत आहेत. असा अंदाज आहे की, साखर कारखाना परिसरातून अनेक दिवसांपासून लोखंड चोरी केले जात होते. कारखाना परिसरातून खूप दिवसापासून लोखंड चोरी होत होते. साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी राधे श्याम गुप्ता यांनी या घटनेची लेखी तक्रार पोलीसांकडे दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here