संजीवनी साखर कारखाना प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे: माजी उपमुख्यमंत्री ढवळीकर

फोंडा, गोवा: संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याबाबत अद्याप स्थिती स्पष्ट झालेली नाही. मात्र, यादरम्यान कारखान्यातील पैशांची हेराफेरी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, संजीवनी साखर कारखान्यात २०१६ मध्ये १९ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे असा आरोप मडकईचे आमदार आणि माजी उप मुख्यमंत्री रामकृष्ण ढवळीकर यांनी केला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे ते म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना माजी उप मुख्यमंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्नाटकातील धारवाडमधील लैला साखर कारखान्याने अद्याप उसाचे पैसे दिलेले नाहीत. उसाच्या तोडणीसाठी मंजूर करण्यात आलेले ४ कोटी रुपयेही शेतकऱ्यांना देण्यात आले नाहीत. सराकरने या कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला निलंबित केले होते असे ढवळीकर यांनी सांगितले. या प्रकरणात कोण दोषी आहे, हे सामोरे येण्यासाठी सीबीआय चौकशीची गरज आहे असे ढवळीकर म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here