केंद्र सरकारकडून सप्टेंबरसाठी साखर विक्रीचा २२ लाख टन कोटा जाहीर

181

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खाद्य मंत्रालयाने २७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील ५५८ कारखान्यांना २२ लाख टनाचा साखर विक्री कोटा मंजूर केला आहे.

गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यासाठी जादा साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. खाद्य मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ साठी २१ लाख टनाचा साखर कोटा मंजूर केला होता. तर दुसरीकडे सप्टेंबर २०२० च्या तुलनेत यावेळी समान कोटा देण्यात आला आहे. सरकारने सप्टेंबर २०२० साठी २२ लाख टन साखर कोटाच मंजूर केला होता.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यासाठीच्या कोट्याचे विस्तारीकरण करण्यात आल्याच्या अफवेचे डीएफपीडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खंडन केले आहे.

गेल्या एक महिन्यापासून दिसत असलेल्या सकारात्मक घडामोडी लक्षात घेऊन बाजाराच्या अभ्यासकांना श्रावण महिन्यातही अशीच स्थिती राहण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला हिंदू धर्मियांचा गणेश चतुर्थीचा सण आणि नवरात्रीपासूनची मागणी कायम राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्र सरकारनेच साखरेचा पुरवठा नियंत्रित करणे आणि किंमत स्थिर राखण्याच्या हेतूने मासिक कोटा जाहीर करण्याची पद्धती सुरू ठेवली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here