केंद्र सरकारकडून डिसेंबरसाठी २१.५० लाख टन साखर विक्रीचा कोटा मंजूर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अन्न मंत्रालयाने डिसेंबर २०२१ साठी देशभरातील ५५८ कारखान्यांना साखर विक्रीसाठी २१.५० लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे.

यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी कोटा मंजूर करण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाने नोव्हेंबर महिन्यासाठी २२.५० लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला होता. तर डिसेंबर २०२०च्या तुलनेत या महिन्यात समान कोट मंजुर केला आहे. डिसेंबर २०२० मध्येही २१.५० लाख टन साखर विक्रीस परवानगी देण्यात आली होती.

बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून साखरेच्या दरात घसरण सुरू आहे. मात्र मंजूर झालेल्या कोट्यामुळे यात आणखी घसरण येण्याची शक्यता नाही. आगामी काही दिवसांत बाजारात संमिश्र स्थिती राहील. केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करणे आणि किंमत स्थिरतेसाठी मासिक कोटा मंजुरीची पद्धती सुरू केली आहे.

1 COMMENT

  1. Please send me quota list of Maharashtra state sugar factories.
    What happens if sugar factory sells sugar in Indian market if they don’t have quota in that month
    Any action done by central government ?
    Some sugar factories have sold sugar in November 2021 without their name in release order in Solapur district Maharastra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here