सणासुदीत बंपर विक्रीमुळे उच्चांकी जीएसटीची केंद्र सरकारला अपेक्षा

सणांच्या हंगामामुळे झालेल्या बंपर विक्रीमुळे पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारला उच्चांकी जीएसटी कर मिळू शकतो. यासंदर्भात livehindustan.com यावर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या महिन्यात १.४१ लाख कोटी रुपयांहून अधिक जीएसटी मिळू शकतो. त्यानंतर जानेवारीत यात काही प्रमाणात घट दिसू शकेल.

उपलब्ध आकडेवारीनुसार यावर्षी मे महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक जीएसटी कलेक्शन झाले होते. हा आकडा १.४१ लाख कोटींचा आहे. जीएएसटीएनच्या आकडावारीनुसार ऑक्टोबर महिन्यात विक्रमी ७.३५ कोटी ई वे बिल तयार करण्यात आले होते. यावर्षी जीएसटी कलेक्शन या महिन्याच्या अखेरपर्यंत असेल. त्यानंतर डिसेंबरमधील आकडा जारी केला जाईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी दीड लाख कोटींवर मिळू शकते. एप्रिल महिन्यात आतापर्यंतचा उच्चांकी जीएसटी मिळाला होता. मार्च महिन्यात ७.१२ कोटी ई वे बिल तयार करण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत एप्रिल महिन्यात उच्चांकी जीएसटी कलेक्शन झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here