केंद्र सरकारकडून कर्ज वितरण आणि इथेनॉल योजना पूर्ण करण्यास मुदतवाढ

केंद्र सरकारने योजनांच्या प्रवर्तकांना आपल्या योजना पूर्ण करण्यासठी आणि व्याज सवलतीचा लाभ उचलण्यााची सुविधा देण्यासाठी २०१८-२१ या कालावधीत अधिसूचित केलेल्या सर्व योजनांच्या कर्ज वितरणाची मुदत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवली आहे.

केंद्र सरकारने खास करुन इथेनॉल मिश्रीत पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमांतर्गत इथेनॉल उत्पादन आणि पुरवठा वाढविण्यासाठी, कारखान्यांच्या आर्थिक तरलतेच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी, साखर कारखान्यांना ऊस दर देण्यास सक्षम बनविण्यासाठी २०१८-२१ या कालावधीत साखर कारखाने, डिस्टिलरींना व्याज सवलत योजनेसाठी अधिसूचित केले होते. एक वर्षाच्या सवलतीसह पाच वर्षांसाठी बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर प्रती वर्ष ६ टक्के अथवा बँकांच्या व्याजदरात ५० टक्के सवलत असे याचे स्वरुप होते.

योजनेंअंतर्गत इथेनॉल योजनांसाठी कर्ज वितरणाची मुदत मार्च -एप्रिल २०२२पर्यंत आहे. कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या दुर्दैवी स्थितीत काही योजनांचे प्रवर्तक बँका, वित्तीय संस्थांकडून कर्ज वितरणाची मर्यादा पाळण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यांच्यासाठी मुदतीत आपल्या योजना पूर्ण करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे २०१८-२१ या कालावधीत जाहीर व्याज सवलत योजनेंतर्गत कर्ज वितरणाची मुदत वाढविण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले होते.

वर्ष २०१४ पूर्वी मोलॅसिसवर आधारीत भट्टींमध्ये इथेनॉल आसवनी क्षमता तेवळ २१५ कोटी लिटर होती. मात्र, गेल्या सात वर्षात सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानंतर मोलॅसीसवर आधारित भट्ट्यांची क्षमता दीड पटींनी वाढली आहे. सद्यस्थितीत ही क्षमता ५५५ कोटी लिटर झाली आहे. धान्यावर आधारित भट्ट्यांची क्षमता २०१३ मध्ये २०६ कोटी लिटर होती. ती आता वाढून २८० कोटी लिटर झाली आहे. अशा प्रकारे देशात एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता ८३५ कोटी लिटरपर्यंत पोहोचली आहे. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी उत्पादन क्षमता जवळपास १७०० कोटी लिटरपर्यंत वाढविण्याची गरज आहे. इथेनॉल योजनांसाठीची मर्यादा वाढविण्याच्या निर्णयामुळे उत्पादन क्षमता अधिक वाढविण्यास मदत होईल.

वर्ष २०१३ पर्यंत ओएमसींना इथेनॉल पुरवठा केवळ ३८ कोटी लिटर केला जात होता. त्यामध्ये इथेनॉल पुरवठा वर्ष २०१३-१४ मध्ये केवळ १.५३ टक्के मिश्रणाचा स्तर होता. इंधन ग्रेड इथेनॉलचे उत्पादन आणि इंधन वितरण कंपन्यांना त्याचा पुरवठा २०१३-१४ पासून २०२०-२१ पर्यंत ८ टक्क्यांनी वाढले आहे. ईएसवाय २०२०-२१ मध्ये आम्ही ऐतिहासिक रुपात जवळपास ३०२.३० कोटी लिटरपर्यंतचा टप्पा गाठला आहे. त्यामध्ये ८.१० टक्के मिश्रण झाले आहे. सद्यस्थितीत ईएसवाय २०२१-२२ मध्ये ३ एप्रिल अखेर १४१ कोटी लिटर इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रीत करण्यात आले आहे. त्याचे प्रमाण ९.६६ टक्के इतके आहे. या इथेनॉल पुरवठा वर्ष २०२१-२२ मध्ये आम्ही १० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकतो, अशी अपेक्षा आहे.

कृषी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी, आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, कच्च्या तेलाच्या आयातीवर होणाऱ्या खर्चातून परकीय चलन वाचवून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने २०२२ पर्यंत पेट्रोलसोबत १० टक्के इंधन ग्रेड इथेनॉल आणि २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here