केंद्र सरकारचा संसदेत १.८७ लाख कोटी रुपये अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोविड महामारी रोखण्यासाठीच्या उपायांसाठी आणि आरोग्य क्षेत्रातील खर्चापोटी १.८७ लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासाठी संसदेकडे मंजुरी मागितली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अनुदानासाठी पूरक मागण्यांचा प्रस्ताव दाखल केला.त्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच खास सुविधेअंतर्गत कर्ज जारी करण्याच्या माध्यमातून राज्यांसाठी १,५८,९९९,९९ कोटी रुपयांच्या निधीचाही समावेश आहे.

दरम्यान, जीएसटीची भरपाई करण्यासाठी राज्यांना कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी आणि राज्य सरकारांना देण्यासाठी केंद्र सरकारला १,५८,९९९.९९ कोटी रुपयांची गरज आहे. अनुदानासाठीच्या या पूरक मागण्या आणि अतिरिक्त अनुदानाचा समावेश सरकारने केला आहे. यातील काही रक्कमेसाठी यापूर्वी संसदेची मंजुरी घेण्यात आली होती.

सरकारने गेल्या महिन्यात आधीच ६.२८ लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे. सरकारला वाढत्या खर्चासह नव्या योजनांसाठी निधीची गरज आहे. त्यासाठी अतिरिक्त, पूरक मागण्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी संसदेसमोर ठेवण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here