मालदिवला ५२० टन साखर निर्यातीस सरकारकडून परवानगी

नवी दिल्ली : भारत सरकारने दोन देशांतील द्विपक्षीय व्यापार करारानुसार (bilateral trade agreement) मालदिवला ५२० मेट्रिक टन (५२० MT) साखर निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत १४ जून रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, वाणिज्य मंत्रालयाने आधीच्या अधिसूचनेसंदर्भात व्यापार करारानुसार मालदीवला साखरेसह विविध वस्तूंच्या निर्यातीस मान्यता दिली आहे.

विदेश व्यापार महासंचालनालयाने जुलै २०२१ रोजी भारत आणि मालदिव यांदरम्यान द्विपक्षीय करारानुसार २०२३-२४ पर्यंत तीन वर्षासाठी साखरेसह विविध वस्तू ठराविक प्रमाणात निर्यात करण्यास परवानगी दिली होती. यासाठी साखर निर्यातीवर सध्या घालण्यात आलेले निर्बंध मालदिवच्या शिपमेंटसाठी लागू होणार नाहीत.

मालदिवसाठी Hari & Co. International LLP ला ५२० टन साखर निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here