केंद्र सरकारने राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना वस्तू आणि सेवा करातील नुकसान भरपाईपोटी 17,000 कोटी रुपये वितरित केले

केंद्र सरकारने एप्रिल ते जून 2022 या कालावधीतील जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातील उर्वरित नुकसानभरपाई म्हणून 24 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यांना 17,000 कोटी रुपये वितरित केले आहेत. यापैकी महाराष्ट्राला सर्वाधिक 2,081 कोटी रुपये मिळाले . (राज्य-निहाय तपशील खालील परिशिष्टात दिले आहेत). 2021-22 या आर्थिक वर्षात जीएसटी भरपाई म्हणून आतापर्यंत राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना उपरोल्लेखित रकमेसह एकूण 1,15,662 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

ऑक्टोबर 2022 पर्यंत केवळ 72,147 कोटी रुपये एकूण अधिभार संकलन झाले ही सत्य परिस्थिती आहे आणि तरीही, केंद्र सरकारतर्फे स्वतःच्या स्त्रोतांकडून 43,515 कोटी रुपये जारी करण्यात येत आहेत. यामुळे केंद्राने आगाऊ स्वरुपात या वर्षी मार्च महिन्यापर्यंत संकलित करण्यात येणारी अधिभाराची अंदाजित संपूर्ण रक्कम राज्यांना भरपाई म्हणून उपलब्ध करून दिली आहे.राज्यांना त्यांच्या स्त्रोतांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करता यावे तसेच विद्यमान आर्थिक वर्षात त्यांचे कार्यक्रम, विशेषतः भांडवलावरील व्यय यशस्वीपणे करणे सुनिश्चित व्हावे या उद्देशाने असा निर्णय घेण्यात आला आहे.

फेब्रुवारी ते मार्च 2022 या काळासाठीची तात्पुरत्या स्वरूपातील जीएसटी भरपाई म्हणून केंद्र सरकारने या वर्षी मे महिन्यात देखील 86,912 कोटी रुपये वितरीत केले होते. त्या वेळी जीएसटी नुकसानभरपाई निधीमध्ये केवळ 25,000 कोटी रुपये शिल्लक असून देखील स्वतःच्या स्त्रोतांमधून 62,000 कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था करून सरकारने राज्यांना पाठबळ पुरविले होते.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here