बिहार, आसाममधील नव्या इथेनॉल योजनांचा केंद्र सरकारने घेतला आढावा

नवी दिल्ली : अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने मंगळवारी नव्या इथेनॉल धोरणाचा आढावा घेतला आणि बिहार तसेच आसाममधील युनिट्सबाबत अद्ययावत माहिती घेतली. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने बिहारमध्ये ३६ योजनांची माहिती अपडेट केली आहे. पाच योजना आधीच चालू झाल्या आहेत. उर्वरीत योजना या वर्षाच्या अखेरपर्यंत
सुरू होतील अशी अपेक्षा आहे. आसाममध्ये ५ नव्या योजनांना सरकारची मंजुरी मिळाली आहे. आणि यावर्षी त्या योजना पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.

सरकारने अलिकडेच ७१ नव्या योजनांना मंजुरी दिली होती. मंत्रालयाने सांगितले की, या योजनांतून पूर्वोत्तर राज्यांतील इथेनॉलची गरज पूर्ण होईल. अन्न मंत्रालयाने सांगितले की, बिहारमध्ये अनेक धान्यावर आधारित डिस्टिलरी स्थापन केल्या जात आहेत. त्यातून पूर्व भारतातील २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यास मदत मिळेल. यापैकी काही युनिटस या वर्ष अखेरीस उत्पादन सुरू करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here