राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २१६० कोटी प्राप्त

826

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मुंबई, ७ मे: महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी २१६० कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले असून यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

आतापर्यंत ४२४८.५९ कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला सातत्याने मदत होते आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता ४००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल करण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि आयोगाने सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आचारसंहिता शिथिल केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here