मध्य रेल्वेकडून १ एप्रिल ते १३ मार्चपर्यंत ५८ मिलियन टन माल वाहतूक

पुणे : गेल्या वर्षभरात, एक एप्रिल ते १३ मार्च या कालावधीत मध्य रेल्वेने ५७.९४ मिलियन टन मालवाहतूक केली आहे. गेल्या तीन महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२० आणि जानेवारी, फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मध्य रेल्वेच्या लोडिंगमध्ये २ टक्क्यांची वाढ झाली आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये २,७२ मिलियन टन मालवाहतुकीच्या तुलनेत डिसेंबर २०२० मध्ये ५.७२ मिलीयन टनाची वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ६.१६ मिलियन टन तर जानेवारी २०२० मध्ये ५.९६ मिलियन टन साखर माल वाहतूक झाली होती.

फेब्रुवारी २०२० मध्ये ५.८० मिलियन टन मालवाहतुकीच्या तुलनेत फेब्रुवारी २०२१ मध्ये ५.९३ मिलियन टन माल पाठविण्यात आला. मध्य रेल्वेने विजेचा पुरवठा पुरेसा असल्याने विविध विज निर्मिती केंद्रांसाठी २८.७२ मिलियन टन कोळशाचा पुरवठा केला आहे. १.५४ मिलियन टन अन्नधान्य आणि साखर, ३.०७ मिलियन टन खते आणि ०.५८ मिलियन टन कांदा, ४.८२ मिलियन टन पेट्रोलियम उत्पादने, १,७४ मिलियन टन लोखंड आणि ५.५२ मिलियन टन सिमेंटची वाहतूक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here