अमेरिकेला अतिरिक्त २०५१ मेट्रिक टन साखर निर्यातीस केंद्र सरकारची अनुमती

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अमेरिकन आर्थिक वर्ष २०२२ साठी टेरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत अमेरिकेला अतिरिक्त २०५१ मेट्रिक टन कच्ची साखर निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. विदेश व्यापार महासंचालकांकडून (DGFT) जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२१ मध्ये आधीच ८४२४ मेट्रिक टन साखर मंजूर होण्यासह आता अमेरिकन आर्थिक वर्ष २०२२ साठी एकूण मंजूर कोटा १०,४७५ मेट्रिक टन झाला आहे.

DGFTने दिलेल्या माहितीनुसार, TRQ हा असा एक कोटा आहे की, ज्यामध्ये विशिष्ट उत्पादनांना निर्धारीत प्रमाणात आयातीस अनुमती दिली जाते. यातील उत्पादने ही विशेष कस्टम अधिसूचनेनुसार आहेत. टेरिफ कोटा उत्पादनांच्या विस्तृत साखळीचा वापर केला जातो. ४ मे रोजी सरकारने यावर्षी साखर उत्पादन गेल्यावर्षीच्या ३१० लाख मेट्रिक टनाच्या तुलनेत ३५५ लाख मेट्रिक टन होईल असे अनुमान जाहीर केले होते. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ९५-१०० लाख टन साखर आयात होईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here