पाचट जाळणे रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे केंद्र सरकारचे पंजाब, हरियाणाला निर्देश

नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारने शेतकऱ्यांकडून पाचट जाळणे बंद व्हावे यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. या अभियानानंतर्गत सर्व ती मदत केंद्राकडून केली जाईल, असेही मंत्री म्हणाले. या राज्यांतील पाचट जाळण्याच्या प्रकारांबाबत प्रसार माध्यमांतून होणाऱ्या नकारात्मक प्रचारामुळे जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले.

मंत्री तोमर यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात या राज्यांना आधीच ६०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. आणि त्यांच्याकडे अद्याप खर्च न केलेले ३०० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचा योग्य वापर केला जावा. याशिवाय जवळपास २ लाख यंत्रे या राज्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. केंद्र आणि संबंधित राज्यांनी संयुक्तपणे यासाठी दीर्घकालीन योजना तयार करण्याची गरज आहे.आणि शून्य पाचट जाळण्याच्या अभियानापर्यंत पोहोचण्याची गरज आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

मंत्री तोमर यांनी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारचे अधिकारी, कृषी, शेतकरी कल्याण विभाग आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीआरई) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईबाबत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. पाचट जाळल्याने युरियाच्या अती वापरा प्रमाणे मातीचे प्रचंड नुकसान होते, असे ते म्हणाले. गेल्या चार वर्षात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत सरकारने छोट्या शेतकऱ्यांना पीक अवशेष प्रतिबंधक मशीनरीसाठी ३८,४२२ हून अधिक कस्टम हायरिंग सेंटर सुरू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here