इराणच्या प्रादेशिक व्यापार केंद्र म्हणून उदयामागे चाबहार बंदराची मोठी भूमिका

तेहरान : चाबहार बंदर इराणसाठी गेम चेंजर ठरले आहे. कारण हे बंदर आदर्श रणनीतीक स्थानावर आहे, जे भारतीय उपमहाद्वीपातून अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील किर्गिस्तान, उझबेकिस्तान सारख्या दोन देशांना जोडते. चाबहार बंदरामुळे भारत आणि अफगाणिस्तानसह भारतीय उपमहाद्वीप आणि मध्य आशियातील व्यापारासाठी येणाऱ्या माल तसेच कार्गोसाठीचा खर्च, शिपिंगचा वेळ या दोन्हीत मोठी कपात होते.

इराणने आपल्यावर लादण्यात आलेल्या सातत्यपूर्ण निर्बंध आणि अमेरिका तसेच इतर पाश्चिमात्य देशांच्या शत्रुत्वाच्या भूमिकेमुळे दीर्द काळापासून आर्थिक आणि भू-राजकीय रुपात संघर्ष केला आहे. मात्र, चाबहार बंदराने इराणला एक हबच्या रुपात पुढे येण्यास खूप मदत केली आहे. अलिकडेच भारत-मध्य आशिया शिखर संमेलनात इराण आणि भारताने मध्य आशियाई देशांना चाबहार बंदरातील हिस्सेदारी प्रदान करणे, आपल्या व्यापारी कार्यांसाठी समर्पीत क्षेत्रांना दूर करणे आणि सीमा शुल्क प्रक्रिया, नियमांना सुलभ बनविण्यासाठी सामंजस्य करार केला होता. किर्गीस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चाबहार बंदराचा वापर करुन किर्गीस्तान आणि भारत यांदरम्यान ये-जा करण्याचा कालावधी ३० ते ४५ दिवसांपासून घटून केवळ दोन आठवड्यांवर येऊ शकतो. भारताने २००३ पासून चाबहार बंदराबाबत ईराणसोबत चर्चा सुरू केली. मात्र २०१४ च्या दुसऱ्या सहामाहीत याला गती मिळाली. त्यामुळे मे २०१५ मध्ये बंदराच्या विकासासाठी दोन्ही देशांमध्ये एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here