सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा अल्पदरात पदार्थांची चव “चाय स्टेशनच्या” माध्यमातून मिळणार

313

या चाय स्टेशनच्या माध्यमातून तरुण युवकांना रोजगाराची संधी मिळणार – उप्पल शाह यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी: अलीकडे धकाधकीची जीवनपद्धती बनली आहे. या जीवनपद्धती मुळे, मुले शिक्षण जरी शिकत असली तरी त्यांना भविष्यात नोकरी मिळेलच असे नाही त्यामुळे तरुण मुले हताश होऊन वेगळे मार्ग पत्करत आहेत अशा मुलांनी खचून न जाता स्वतःचा व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून दहावीत नापास तरीही व्यवसायात गरुड भरारी घेणाऱ्या उप्पल शाह यांनी जेके ग्रुप व रिषभ डेव्हलपर्स यांना सोबत घेऊन “चाय स्टेशन” सुरू केले आहे. या चाय स्टेशनच्या माध्यमातून हजारो तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती “चाय स्टेशन” सर्व्हिसेस प्रा. लि. चे उप्पल शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आज या “चाय स्टेशनचा” कोल्हापूरमध्ये दाभोळकर कॉर्नर येथे शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या स्टेशनच्या शाखा येत्या सहा महिन्यांमध्ये सुरू करण्यात येणार असून या स्टेशनच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरामध्ये वेगवेगळे पदार्थ सर्वसामान्य लोकांना चाखायला व खायला मिळणार आहेत. चाय कॅफे फ्रांचाईजि चेन कंपनी आहे ही ISO 9001-2015 व ISO 22000-2018 आणि FSSAI certified अशी डबल मानांकित प्रा.लि. कंपनी आहे. सदर चाय स्टेशन हे नाव रजिस्टर्ड ट्रेडमार्क असून दुसरे कोणीही हे नाव वापरू शकणार नाहीत असेही शाह यांनी सांगितले.
या स्टेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा अल्प दरातील पदार्थांची सोय याठिकाणी करण्यात आली आहे. शिवाय सर्वसामान्य लोकांना आवडतील ते पदार्थ ऑफिस मध्ये तीस मिनिटांमध्ये ऑर्डर केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत तशी ऑनलाईन ऑर्डरची सोय याठिकाणी करण्यात आली आहे. शिवाय दर्जेदार पदार्थ बनविणारे शेफ या ठिकाणी पदार्थ बनवणार असून या व्यवसायामध्ये उतरणाऱ्या युवकांना नवीन-नवीन पदार्थ या ठिकाणी शिकविले जाणार आहेत असेही उप्पल शाह यांनी सांगितले.

याठिकाणी चहा, मसाला चहा, स्पेशल चहा, आयुर्वेदिक चहा बिस्किट,क्रिम बन, नग्गेट्स, बॉम्बे टिक्की आदी पदार्थ सर्वसामान्यांना परवडतील अशा अल्प दरात उपलब्ध करण्यात आले आहेत असे उप्पल शाह यांनी यावेळी सांगितले.

अनेक व्यवसायांची जबाबदारी सांभाळताना उप्पल शाह यांनी सामाजिक भानही जपलेले आहे. जे.के. चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सध्या ते सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. सध्या कोल्हापुरात दोन वेळचे गरम जेवणाचे डबे मोफत घरी पोहोचवण्याचे काम हा ट्रस्ट करत आहे. आता त्यांनी स्वतःला व आताचे वातावरण डोळ्याडामोर ठेऊन आणखी एक नवे पाऊल या चाय स्टेशनच्या माध्यमातून पुढे टाकले आहे असेच म्हणावे लागेल.

या शुभारंभ प्रसंगी संजय डी पाटील,माजी आम. सुजित मिनचेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, जयेश ओसवाल, जितु के. शाह, महावीर गाठ, वैभव ओसवाल, शैलेश ओसवाल, हेमंत शाह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

SOURCEchinimandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here