श्री शंकर कारखान्याच्या चेअरमनपदी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील बिनविरोध

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सहकारमहर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिपथावर असलेला श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. (सदाशिवनगर) ची नूतन संचालक मंडळ निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीनंतर कारखाना कार्यस्थळी बैठक झाली. यामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी टिळेकर यांनी ही निवड जाहीर केली.

माजी जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, संचालक सुरेश पाटील, महादेव शिंदे, दत्तात्रय रणनवरे, बाळासाहेब माने, कुमार पाटील, सुधाकर पोळ, मालोजीराव देशमुख, प्रफुल्ल कुलकर्णी, शिवाजी गोरे, सदाशिव वाघमोडे-पाटील, रणजीत पाटील, बलभीम पाटील, दत्तात्रय मिसाळ, सचिन लोकरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here