चकिया साखर कारखाना सुरु करणार: तेजस्वी यादव

मोतिहारी, बिहार: नेता प्रतिपक्ष तेजस्वी यादव यांनी सांगितले की, 10 नोव्हेंबर ला नीतीश सरकारला निरोप द्यायचे निश्‍चित आहे. नीतीश कुमार आता थकले आहेत. ते आता बिहारला सांभाळू शकत नाहीत. आमचे सरकार आल्यास कैबिनेट च्या पहिल्या बैठक़ीमध्ये पहिल्या कलमानेच दहा लाख तरुणांना सरकारी नोकरी मिळेल. शेतकर्‍यांचे कर्ज माफ होईल.

चकिया साखर कारखानाही सुरु केला जाईल. यादव रविवारी तेतरिया हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या निवडणुक सभेत बोलत होते. त्यांनी सांगितले की, शिक्षकांना समान कामासाठी समान वेतन दिले जाईल. बेरोजगारांना एक हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल. नोकरीसाठी आवेदन फी घेतली जाणार नाही. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रखंड राजद अध्यक्ष गोपाल सहनी होते. सूत्रसंचालन राधा मोहन यादव यांनी केले.

यावेळी राजद नेता विनोद श्रीवास्तव, सीपीएम चे माजी आमदार रामाश्रय सिंह, प्रदेश युवा राजद प्रवक्ता संजय निराला, प्रदेश राजद सुबोध यादव, काँग्रेस चे प्रदेश सचिव अरुण यादव, राजद चे पवन यादव, माधव मधुकर, भगयनारायण यादव, श्रीबाबू यादव, जगजीवन बैठा, धर्मोदर यादव, अवधेश यादव, सीपीएम चे शैलेंद्र कुशवाहा, अजय यादव, बकिम चंद्र दत्ता यांच्यासह अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here