पुढील पाच दिवसात या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, आयएमडीचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाने देशातील विविध भागात पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यापैकी ठिकाणी पुढील २४ तासांत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, आगामी ५ दिवसांत केरळ, तामीळनाडू, कर्नाटकच्या अंतर्गत भागात हलका पाऊस कोसळेल. तर आंध्र प्रदेश आमि रायलसीमामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने तामीळनाडू, पुद्दूचेरी, कराईकल येथेही २५-२६ ऑक्टोबरला पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुढील २४ तासात जम्मू-काश्मीरचा पूर्व भाग, लडाख, हिमाचल प्रदेशात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस, बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या २४ तासात या परिस्थितीत सुधारणा होईल.

दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या उत्तर भागात ठिकठिकाणी पाऊस कोसळेल. तर जम्मू-काश्मीरचा पूर्व भाग, लडाखमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here