उत्तर प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता

34

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जहांगिराबाद, अनुपशहर, शिकारपूर, पाहसू, देबाई, नरौला, अतरौली, खैर, अलीगड, राया, मथूरा, आग्रा या महत्त्वाच्या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ढगांची दाटी झाल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता पश्चिम विभागाकडे सरकत आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून पुढील सात दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत या पावसाआधीच हाहाकार उडाला आहे. त्यात आता या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड यांसह केरळ, पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आगामी काळात पावसाची तिव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here